वर्ग ६वी धडा ५. तापमान.....
पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंब रूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंब रूप तर काही भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. लंब रूप प्रकाश किरण कमी जगा व्यापतात. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यांमुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमा न होते. परिणामी विषुववृत्ता पासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसर पृथ्वीचे विषुववृत्ता पासून धृव पर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधात विभाजन करता येते. स्मुद्रसनिध्य, खंडांतर्ग त , समुद्रसपाटीपासून ची उंची व प्राकृतिक रचना या घटकां नुसार प्रदेशामधील हवामानात विविधता आधळ ते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वणाच्छा दन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापक पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठ्णबिंदू -३९ डिग्री सल्सिअस आहे, तर अल्कोहोल गोठ्णबिंदू -१३० डिग्री सल्सिअस आहे.
0 Comments
Thanks for showing interest