धडा ३ रा पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्र भेट......
मुलांनो पृथ्वी गोलावर अक्षव्रत्ते आणि रेखा वृत्ते कशी काढली जातात आणि त्यावरून स्थान निश्चिती कशी केली जाते हे आपण शिकलो आहोत. या पाठात आपण पृथ्वी गोल व नकाशा यामधील फरक शिकणार आहोत. भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्र भेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते. भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला भेट द्या. उदा. नक्षत्राल य, डाकघर, बसस्थानक, मॉल, डोंगर,समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र, इत्यादी. या ठिकाणी आढल लेल्या विविध बाबींची माहिती घ्या, निरीक्षणे नोंदवा. क्षेत्र भेटीमध्ये शिक्षक तुम्हाला संबंधित ठिकाणची माहिती सांगतील. शिक्षकांच्या मदतीने प्रश्नावली तयार करा. आवश्यकता असेल तेथे मुलाखती घ्या व त्यांच्या नोंदी ठेवा. चित्रे काढा. रेखाटने तयार करा.
0 Comments
Thanks for showing interest