स्वराज्य स्थापना
शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील बुद्धिमान, राजनितीज्ञ असणारे आणि तलवार, पट्टा व भाला चालवण्यात पटाईत असणारे मातब्बर सरदार होते. नंतर मुघलांनी आदिलशहाच्या मदतीने निजामशाही जिंकण्याचा प्रयत्न केला. इ.१६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव झाला.त्यामुळे शहाजीराजे आदिलशाहीत सामील झाल्यावर आदिलशाहने पुणे, सुपे, इंदापूर व चाकण ही शहाजिराजांची मूळ जहागीर आणि कर्नाटकातील बंगळूरू व त्यापासचा प्रदेशही त्यांना जहागीर म्हणून दिली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला.जिजमाता यांनी शिवरायांना विविध विद्यांबरोबरच लष्करी शिक्षणही दिले. शिवरायांनी ' बारा मावळचे खोरे ' येथून स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली.राजमुद्रा तयार केली. स्वराज्यासाठी किल्ल्यांचे महत्त्व जाणून त्यांनी किल्ल्यांना विशेष महत्व दिले.विरोधकांचा बंदोबस्त केला.आरमाराची उभारणी केली.
या पाठ वर आधारित व्हिडिओ पाहणे.
या पाठ वर आधारित ऑनलाईन टेस्ट.< >
0 Comments
Thanks for showing interest