4. < हवा व हवामान....
एखाद्या ठिकाणची विशिष्ठ वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अकल्पनीय असते. यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. उदा. , थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा, इत्यादी. लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतु अनुभवले आहेत. त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जानेवारी ते डिसेंबर या वर्ष भराच्या काळात साधारणतः कोणते ऋतु कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहा. तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतुचा विशिष्ठ कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतु अनुभवत असतो. हवामानशास्त्र ज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदा., हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता, इत्यादी मुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहार वर व जीवन शैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो.<
हवा आणि हवामान या पाठ वर आधारित व्हिडिओ पहा
0 Comments
Thanks for showing interest