सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र निजामशाह, आदिलशाह आणि मुघल यांच्या ताब्यात होता. आफ्रिकेतील सिद्दिनी कोकण किनारपट्टीवर तर पोर्तुगीज नी गोवा व वसईत सत्ता स्थापन केली होती. शिवपूर्व काळात गाव, कसबा आणि परगणा अशी राजकीय यंत्रणा होती.त्यानुसार बलुतं व बलुतेदार पद्धती होती. तसेच रयत आणि सरकार यातील दुवा असलेले वतनदार हे जनतेचे शोषण करत होते. यातच 1630 साली झालेल्या दुष्काळामुळे धान्याची तीव्र टंचाई व व्यवसायाची हानी, गुरे ढोरे मरून लोक देशोधळीला लागून समाज जीवन उद्ध्वस्त झाले.यामुळे समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, प्रयत्न शिलता यासारखे दोष निर्माण झाले.यातच वारकरी पंथ असले संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, रामदास स्वामी,संत तुकाराम यांच्यासारखी संतमंडळी निर्माण झाली. विठ्ठल दैवत असलेल्या संतांनी भजन, कीर्तन, काला ( सहभोजन माध्यमातून समाजात ईश्वर प्रेम,समानता व मानवता यांची शिकवण दिली. यामुळे लोक जागृती झाली लोकात आत्मविश्वास निर्माण झाला आणि लोक भाषेत उपदेश केल्यामुळे नैतिक आचरण ही सुधारले.
या पाठ वर आधारित व्हिडिओ पाहा
0 Comments
Thanks for showing interest