Ranvedi Kavita
१.रानवेडी कविता ,Ranvedi
Ranvedi poem- शब्दार्थ
भाळली-मोहित झाली,नाद–छंद ,पांगली–पसरली,मोहर-फुलोरा,टंटणी-बारीक फुलांची वनस्पती,फुली–नाकात घालायची चमकी,बुरांडी–पिवळ्या फुलांचे झुडूप,पहाळी-पावसाची सर,वाळली–सुकली.गाण्याचा अर्थ-Ranvedi Kavita
ती लहानगी मुलगी डोंगरावर भुलली.त्याच्या नादी लागून सगळ्या रानात आनंदाने हुंदडली.रानगवताची फुलं तिच्या कानांमध्ये डोलू लागली.चाईच्या फुलांच्या मोहराची माळ तिने गळ्यात सरीसारखी घातली.टंटणीची फुलं तिने नाकात चमकीसारखी घातली आणि बुरांडीची पिवळी फुले तिने केसात माळली.ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली. ती लहानगी मुलगी हिरवळीवर खेळली आणि वाऱ्याशी बोलली.वडाच्या पारंबीचा तिने झोका केला.तिचा झोका उंच आभाळात गेला.तिने पानसाबरीचे बोंड खाल्ल्यामुळे तिचे तोंड लाल झाले.मग ती हसत हसत मऊ गवतावर लोळू लागली.ती लहानगी मुलगी डोंगराला भाळली. डोंगरातून वाहत खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटेने गाई डोंगरावर जोमाने चढत चालल्या होत्या.ढगांचा गडगडात झाला.जणू ढगांचा ढोल वाजू लागला.मुलीने रानात मोरांचा नाच पाहिला.पावसाची मोठी सर येताच ती डोंगराच्या कपारीत आडोशाला लपली.पुन्हा फिरून ऊन पडले,तेव्हा मघाशी पावसात जरी ती भिजली होती,तरी ती उन्हात सुकली.व्हिडिओ पहा
0 Comments
Thanks for showing interest